HW Marathi
देश / विदेश

आजपासून ‘समझौता एक्स्प्रेस’ पुन्हा पाकिस्तानसाठी रवाना होणार

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रद्द करण्यात आलेली समझौता एक्सप्रेस आजपासून (३ मार्च) पुन्हा रुळावर धावणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या या दोन्ही देशांच्या रेल्वे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे समझौता एक्स्प्रेस आज रात्री ११.१० वाजता दिल्लीहून अटारीला पोहोचेल त्यानंतर ही एक्सप्रेस पुढे लाहौरमध्ये दाखल होईल.

भारत-पाकिस्तानमधील समझौता एक्सप्रेस दर रविवारी आणि बुधवारी दिल्लीतून पाकिस्तानसाठी रवाना होते. तर पुन्हा दर सोमवारी आणि गुरुवारी पाकिस्तानमधून भारतासाठी रवाना होते. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या पाकिस्तानातू झालेल्या सुखरूप सुटकेनंतर समझौता एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या रेल्वे विभागाकडून घेण्यात आला.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढले. तेव्हापासून भारत-पाकिस्तानमध्ये धावणारी समझौता एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. त्यांनतर भारतीय वायू दलाकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकने पाकिस्तान बिधरला. आपल्या क्षमतेचे दर्शन घडविण्यासाठी पाकिस्तानच्या वायू दलाने भारताच्या हवाई हद्दीत शिरून गोळीबार केला.

पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना परतवून लावताना भारतचे मिग-२१ विमान पडले आणि भारतीय वायू दलाचे कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या हाती लागले. भारताची कठोर कारवाई आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने शांततेच्या प्रस्तावाचे कारण पुढे करत कमांडर अभिनंदन यांची सुटका केली. आता अभिनंदन यांच्या सुटकेनंतर समझौता एक्स्प्रेस पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे अद्यापही सुरूच आहे.

Related posts

कतार ‘ओपेक’मधून बाहेर पडणार

News Desk

दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत डीएसपी अमन ठाकूर शहीद

News Desk

राफेल डीलसाठी मोदी सरकारकडूनच रिलायन्सची निवड | फ्रान्स्वा ओलांद

अपर्णा गोतपागर