HW News Marathi
देश / विदेश

इंधन दरात आज देखील घट कायम

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात घट होत आहे.आज पुन्हा एकदा इंधन दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर १७ पैसे तर, डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईकरांना प्रतिलिटर पेट्रोलसाठी ८३.०७ रुपये तर, प्रतिलिटर डिझेलसाठी ७५.७६ रुपये मोजावे लागणार आहे. या सतत होणाऱ्या इंधन घटामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळत आहे.

राजधानी नवी दिल्लीमध्ये सुद्धा इंधनात घट झाली आहे. पेट्रोल १७ पैशांनी तर डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे राजधानीत प्रतिलिटर पेट्रोलसाठी ७७.५६ रुपये, तर प्रतिलिटर डिझेलसाठी ७२.३१ रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या सलग काही आठवड्यांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने घट होत आहे. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सलग नवव्या दिवशी पेट्रोल २५ पैशांनी स्वस्त

Gauri Tilekar

इस्रो करणार ८ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित

News Desk

इस्रोच्या कार्यालयाला आग

News Desk