HW News Marathi
देश / विदेश

नाशिकचा जवान केशव गोसावी यांना काश्मीरमध्ये वीरमरण

जम्मू । पाकिस्तान आणि भारतीय या दोन्ही लष्करामध्ये रविवार(११ नोव्हेंबर) दुपारी गोळीबारात सुरु होती. या गोळीबारी दरम्यान केलेल्या गोळीबारात नौशेरा सेक्टरमध्ये तैन्यात असलेले जवान केशव सोमगीर गोसावी हे शहीद झाले आहे. जवान केशव गोसावी हे मूळचे सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर येथे राहणारे होते.

पाकिस्तानी लष्कराने रविवारी (११ नोव्हेंबर) दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास नौशेरा सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये जवान केशव गोसावी यांना गोळी लागुन ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांचे नुकसान केले. केशव गोसावी लष्करात नाईक पदावर कार्यरत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट ६ महिन्यांसाठी वाढवावी | शहा

News Desk

मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा

News Desk

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही, मनसेचा टोला

News Desk