HW News Marathi
देश / विदेश

डॉ. आंबेडकरांना अपमानित करणे ही गांधी घराण्याची परंपराचं

नवीदिल्ली- कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवार २३ एप्रिल २०१८ रोजी दिल्लीतून संविधान बचाव अभियानाला सुरुवात केली. या अभियानाला सुरुवात करताना राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाज सरकारवर सडकून टिका केली. या टिकेला भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्यूउत्तर दिले आहे.

राहुल यांच्या टिकेला उत्तर देताना शहा म्हणाले, जर असा कोणता राजकीय पक्ष आहे ज्याने आमच्या संविधान विषयी असलेल्या भावना दुखावल्या आहेत तर तो कॉंग्रेस पक्ष आहे. कॉंग्रेस लोकशाही राज्य चालवत नाही तर वंशपरंपरेचे राज्य चालवते. भाजप पेक्षा कॉंग्रेस पासून संविधान वाचविण्याची हल्ली जास्त गरज आहे. राजकीय फायदासाठी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि लष्करावरही हल्ले केले जातात.

काँग्रेस पार्टीने संविधान तयार केले आहे असे राहुल गांधी वारंवार बोलून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करत आहेत. जेव्हा आंबेडकर जिवंत होते तेव्हा त्यांना गांधी-नेहरु कुटुंबाने अपमानित केले आता तीच परंपरा राहुल चालवत आहेत. ही बाब अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही यावेळी अमित शहा म्हणाले.

 

Related posts

…तरीही मी फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग म्हणणार नाही !

News Desk

‘सत्ता हा नात्यांचा धागा नसतो’, मोदी-उद्धव भेटीवर सामनाच्या अग्रलेखात काय लिहिले आहे?

News Desk

केंद्र सरकारने घातली ‘टिक-टॉक’वर बंदी, सोशल मीडियावर मिमचा पाऊस

News Desk