HW News Marathi
देश / विदेश

मराठा आरक्षणावर ८ ऑगस्टला राहुल गांधी यांची बैठक 

मुंबई । महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण मुद्दा तापलेला असतांना या विषयात आता काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठा आरक्षणावर सध्या राज्यभरात आंदोलनं सुरु असून या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत बैठक बोलावली आहे. राहुल गांधी यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. ८ ऑगस्टला ही बैठक पार पडणार असून यावेळी राहुल गांधी नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

सरकारकडून ७ ऑगस्टपर्यंत समाजाच्या सर्व मागण्यांवर विचार व्हावा अन्यथा राज्यभर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा सकल मराठा मोर्चाकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे. सकल मराठा मोर्चाला परळीतून सुरुवात झाली त्यामुळे समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारने परळीत येऊनच चर्चा करावी. आमचे कोणतेही समन्वयक सरकारशी चर्चेसाठी जाणार नाहीत अशी भूमिका घेण्यात आली आहे.

दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयात लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती. यानंतर न्यायाधीश रणजीत मोरे आणि अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठाने सुनावणी १४ ऑगस्टऐवजी ७ ऑगस्टला घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखयांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, धक्का मिळणार की दिलासा?

News Desk

बुर्ज खलिफा या इमारतीत भारद्वाज बंधुंचा फ्लॅट

News Desk

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच ‘हे’ सगळं सुरु, नवनीत राणांचा गंभीर आरोप 

News Desk