HW News Marathi
देश / विदेश

सामूहिक बलात्कार प्रकरणी आमदार कुलदीप सेंगर सीबीआयच्या जाळ्यात

मुंबई | भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी सीबीआयने अटक केले. पहाटे साडेचारच्या सुमारास सेंगर यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. सीबीआयच्या कार्यलयात कुलदीप सिंह सेंगरची चौकशी सुरू आहे. अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण

भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांच्या भावाने जून २०१७ मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. न्याय मिळावा म्हणून पीडित तरुणीचे कुटुंब उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीच्या वडिलांना यावेळी पोलिसांनी अटक केली. परंतु पोलीस कोठडीत पीडित तरुणीच्या वडिलांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढच्या ८ दिवसांत शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवणार, कर्नाटक सरकारचे आश्वासन

News Desk

मोठी बातमी! ‘प्रशांत किशोर यांनी मुख्य सल्लागार पदाचा दिला राजीनामा’

News Desk

महिला पत्रकारांना पाठवू नका, हिंदू संघटनांचे माध्यमांना पत्र

swarit