HW News Marathi
देश / विदेश

उत्तर प्रदेश पोलीस हत्याकांड, मुख्य आरोपी विकास दुबेला अटक

उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेशातील ८ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असणारा मुख्य आरोपी विकास दुबे याला अटक करण्यात आली आहे. उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता.

या गोळीबारात ८ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

दुसरीकडे पोलीस विकास दुबेचा शोध घेत असताना बुधवारी तो पुन्हा एकदा पोलिसांच्या हातून निसटला होता. विकास दुबे हरियाणामधील फरिदाबाद येथील एका हॉटेलमध्ये पाहण्यात आलं होतं. मंगळवारी पोलिसांनी फरिदाबाद येथील हॉटेलवर छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली.

चौकशी केली असता पोलीस पोहोचण्याआधीच विकास दुबेने हॉटेलमधून पळ काढला असल्याची माहिती त्याने दिली होती. पण अखेर पोलिसांना विकास दुबेला अटक करण्यात यश मिळालं आहे.विकास दुबे याच्यावर हत्या, अपहरण, खंडणी, दंगल भडकवणे असे ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. विकास दुबे याला पोलिसांनीच अटकेसाठी पथक येत असल्याची माहिती दिली होती. या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus | बुलढाण्यात कोरोनाचा राज्यातील ८ वा बळी

News Desk

पद्म भूषण पुरस्काराने गौरविले सुंदर पिचाई अडचणीत का आले?

Aprna

“चर्चेचे दरवाजे बंद झाल्याचं तुम्ही ऐकलंत का?”, शेतकरी आंदोलनावर प्रकाश जावडेकरांची प्रतिक्रिया 

News Desk