नवी दिल्ली | ‘गाजा’ या चक्रीवादळाची निर्मिती बंगालच्या उपसागरामध्ये झाली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे ‘गाजा’ हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ सरकत आहे. कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा येथे १५ नोव्हेंबरला हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.
Cyclonic storm 'Gaja' now lies at about 820 km east northeast of Nagapattinam. It is expected to cross between Chennai & Nagapattinam during forenoon on 15th Nov. Sea will be very rough, fishermen are advised not to venture in the sea till 15th Nov: Director IMD Chennai pic.twitter.com/BxhA1Fxeay
— ANI (@ANI) November 12, 2018
या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडुन वर्तवण्यात आला आहे. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मधल्या काही भागात आकाश निरभ्र आहे. तसेच अनेक ठिकाणी रात्रीचे तापमान २० अंशांच्या खाली आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.