HW Marathi
देश / विदेश

‘जम्मू-काश्मीर भारताचे राज्य’, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची कबुली

जिनिव्हा | केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघात हा मुद्दा घेऊन घेले होते. संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तान अपयश आल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा घेऊन जिनिव्हा येथे आज (१० सप्टेंबर) सुरू असलेल्या  ७२ वी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (यूएनएचआरसी) मांडणार आहे.  “जम्मू-काश्मीर भारताचे राज्य आहे,” अशी कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी दिली आहे. काश्मीरमध्ये होणाऱ्या मानवाधिकाराच्या उल्लंघनासाठी संयुक्त चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही शाह यावेळी यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान काश्मीरच्या मुद्दयावरून भारताला युद्धाची धमकी देत आहे. दरम्यान, आज पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. पंरतु, यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काश्मीरचा उल्लेख “इंडियन स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर” असा केला. त्यामुळे पाकिस्तानने अप्रत्यक्षपणे काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगासमोर कबुल केल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Related posts

मोदी आणि राज यांच्यात का..रे…दुरावा..!

तृप्ती देसाई लवकरच सबरीमाला मंदिरात प्रवेश करणार

News Desk

चित्रपटगृहात राष्ट्रगीताची सक्ती नाही- सुप्रिम कोर्ट

News Desk