HW News Marathi
देश / विदेश

राजीव गांधींचा ‘भारतरत्न’ परत घ्या!

नवी दिल्ली | शीख दंगलीवरून सध्या दिल्लीत राजकीय वातावरण तापलेले पहायला मिळत आहे. १९८४ मध्ये उसळलेल्या शीख दंगलीतील आरोपी सज्जन कुमारला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणानंतर दिल्लीत नवीन वादाला तोंड फुटलेले पहायला मिळत आहे. आप सरकारने विधानसभेत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

शीख दंगलीवरून काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. यामुळे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. तसेच 31 जानेवारीपर्यंत मुभा देण्याची मागणीही त्यांनी केली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये दंगल उसळली होती. यामध्ये सज्जन कुमार यांचा हात असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

दिल्लीमध्ये सध्या सत्तेत असणाऱ्या आपने पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील आगामी निवडणूका निवडणुका लक्षात घेऊन ही खेळी केली आहे. आपने विधानसभेमध्ये राजीव गांधी यांच्यामुळे शीख दंगल उसळली होती. यामुळे ते या दंगलीला जबाबदार होते. यामुळे त्यांना देण्यात आलेला देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न काढून घेण्यात यावा, असा प्रस्ताव शुक्रवारी मांडला होता. तो बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चित्रपटगृहात राष्ट्रगीताची सक्ती नाही- सुप्रिम कोर्ट

News Desk

देवेंद्र फडणवीस पुण्याहून दिल्लीच्या दिशेने रवाना; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

शरद पवार बोलले ‘तो’ राष्ट्रवादीचा अजेंडा, मात्र शिवसेनेचे हिंदुत्त्व जगजाहीर !

News Desk
मुंबई

अश्लील चाळे करणा-या प्रेमी युगुलावर कारवाई

News Desk

मुंबई | मरीन ड्राईव्ह म्हटले की डोळ्यासमोर उभा रहातो तो समुद्र किणारा आणि बेभान तरुणाई. मरीन ड्राईव्हला समुद्र किनारी प्रेमी युगुल बसलेली असतात. परंतु शुक्रवारी सकाळी रस्त्यामधील दुभाजकावर बसून एक युगुल अश्लील चाळे करत होते. त्यांचा हा प्रकार काही मंडळींनी तर मोबाईलमध्ये कैद केला. पण रस्त्याच्या मधोमध हे सुरु असल्याने उपस्थितांचे लक्ष या जोडप्याने चांगलेच वेधून घेतले.

या प्रेमी जोडप्याचे चाळे सुरु होताच काही मिनिटांमध्येच त्याठीकाणी पोलिसांचे गस्ती पथक पोहोचले. पोलिसांना बघून त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तर तिच्यासोबत अश्लील चाळे करणारा परदेशी तरुण तिथून पळून गेला.

हाती आलेल्या माहीती नुसार ही महीला गोव्याची असुन तिचे वागणे आणि बोलणे विचित्र आहे. यावरुन तिला मानसिक आजार असाव असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या या महिलेची रवानगी सुधारगृहात करण्यात आली असून महिलेसोबत अश्लील चाळे करणा-या परदेशी तरुणाचाही पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

 

Related posts

चर्नी रोडचा पादचारी पुल दुरुस्तीसाठी २८ सप्टेंबरपासून बंद

Gauri Tilekar

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण | तिन्ही आरोपींच्या जामीनाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब

News Desk

Breaking News | काळबादेवी परीसरात चंद्रभवन इमारतीला आग

News Desk