जम्मू-काश्मीर | भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी (७ ऑगस्ट) जम्मू-काश्मीरमधील शोपियातील नागरिकांची भेट घेतली. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. अजित डोवाल यांच्यासोबत असलेले लोक हे पैसे देऊन आणलेले आहेत, असा गंभीर आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते शाहनवाज हुसैन यांनी गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या या वक्तव्याबाबत तातडीने माफी मागावी अशी मागणी केली आहे.
#WATCH: Ghulam Nabi Azad, Congress on pictures of National Security Advisor (NSA) Ajit Doval interacting with locals in Shopian yesterday: Paise dekar aap kisiko bhi saath le sakte ho. #JammuAndKashmir pic.twitter.com/iJgwezkeWb
— ANI (@ANI) August 8, 2019
“तुम्ही पैसे देऊन कोणालाही सोबत घेऊ शकता. असे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे कि काश्मिरी लोकांवर कर्फ्यू लावण्यात आला आहे”, अशी टीका गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्या या टीकेला भाजप नेते शाहनवाज हुसैन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “सध्या काँग्रेस पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहे. गुलाब नबी यांनी आपल्या वक्तव्याबाबत तातडीने माफी मागावी. पाकिस्तानला त्यांच्या या वक्तव्याचा फायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल”, असे शाहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारच्या जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर येथील तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्राकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. अजित डोवाल यांनी येथील नागरिकांशी जेवण करत केलेली बातचीत हा याचाच एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर फुटिरतावादी नेत्यांकडून राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा-व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.