HW News Marathi
देश / विदेश

प्रेमात अडचण ठरल्याने प्रेयसीच्या मुलीची हत्या

नवी दिल्ली- प्रेमात अडचण निर्माण करणाऱ्या आपल्या प्रेयसीच्या चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पूर्व दिल्लीमधील गाजीपूर येथे घडली आहे. आरोपी व्यक्तीचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. जेव्हा त्याने आपल्या लग्नाचा प्रस्ताव महिलेसमोर ठेवला तेव्हा तिने उत्तर देण्याआधी काही अटी ठेवल्या होत्या. अटीनुसार तिच्या मुलीलाही स्वत:ची मुलगी म्हणून स्विकारले पाहिजे, तसेच तिच्या शिक्षणाचा खर्चही उचलला जावा. प्रेयसीला मिळवण्यासाठी आतूर झालेल्या आरोपीला ही अट मान्य नव्हती. मुलीचा बाप होण्यास तयार नसल्याने त्याने हत्येचा कट रचला. दोन सप्टेंबर रोजी चिमुरडी आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण घराबाहेर पडलेली ती पुन्हा परतलीच नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

युएपीए विधेयक राज्यसभेत मंजूर

News Desk

महाराष्ट्रातील पोलीसांना शौर्य पदक जाहीर

swarit

खासदारांचे वेतन घ्या पण खासदार निधी कापू नका, नवनीत राणांची मागणी

News Desk
क्राइम

एक कोटींची ब्राऊन शुगर जप्त

News Desk

मुंबई अंबोली पोलिसांनी अंधेरी लिंक रोड परिसरातून सोमवारी एक कोटी रूपयांचे ब्राऊन शुगर जप्त केले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जितेश राठोर (23) आणि नटवर सिंह (27) असे आरोपीचे नाव आहेत.

काही महिण्यांपूर्वी पोलिसांनी मेफेड्रोन या अंमली पदार्थाची फॅक्टरी उध्वस्थ केली होती. त्यानंतरही पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ब्राऊनशुगर सापडल्यां पुन्हा एकादा ब्राऊन शुगर तस्करी करणारी टोळी सक्रीय झाल्याचे दिसून येते.

ब्राऊन शुगर तस्करी करणारे काही इसम अंधेरी लिंक रोडवर सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपयुक्त देहिया, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि त्यांच्या पथकाने एक कोटींची ब्राऊन शुगर ताब्यात घेतली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या एक किलो ब्राऊन शुगरची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतील किंमत एक कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 

Related posts

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर

Aprna

अनिल परब यांचे म्हणणे ऐकू- उच्च न्यायालय

News Desk

उल्हासनगरमध्ये दोन गटातील हाणामारी सीसीटिव्हीत कैद

News Desk