HW News Marathi
Covid-19

कोरोनावर सापडले औषध ! सौम्य लक्षणांवर ‘फेविपीरावीर’ औषधाला भारतात परवानगी

मुंबई | जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढ आहे. तर संपूर्ण जगात कोरोनावर लस शोधण्याचे काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. अमेरिकेतील काही कंपन्यांकडून वेगाने संशोधन सुरू आहे. आता कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी भारतातील ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने औषध आणले आहे. या अँटीव्हायरल औषधाचे नाव ‘फेविपिरावीर’ असे आहे. ‘डीजीसीआई’ने या औषधाच्या उत्पादनाला आणि विक्रीला परवानगी दिली आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. या औषधाच्या एका गोळीची किंमत ही १०३ रुपये इतकी आहे.

करोना व्हायरसची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णावर फेविपिरावीर औषध परिणामकारक ठरेल, असा दावा ग्लेनमार्क फार्माने केला आहे. ग्लेनमार्कने फैबीफ्ल्यू ( FabiFlu) या ब्रँड अंतर्गत फेविपिरावीर औषध सादर केले आहे. फेविपिरावीरचे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी भारतीय औषध महानियंत्रकाने ग्लेनमार्क फार्माला दिली आहे. त्यामुळे लवकरच हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे करोना रोखण्यासाठी पहिल्यांदाच एखाद्या औषधाला सरकारने मान्यता दिली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात ६,६५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ !

News Desk

देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५ लाखांच्या पार

News Desk