HW News Marathi
देश / विदेश

#SolarEclipse2020 : ‘सूर्यग्रहण’ सुरू, देशातील काही भागात दिसणार ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’

मुंबई | यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज सुरू झाले आहे. विशेष म्हणजे आजचे सूर्यग्रहण वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी आणि सर्वात लहान रात्री ही खगोलीय घटना घडणार आहे. आजचे (२१ जून) सूर्यग्रहण हे कंकणाकृती आहे. याआज हे ग्रहण जागतिक पातळीवर हे ग्रहण असून सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपासून सुरू होणार असून दुपारी ३ वाजून ३ मिनिटांनी ते संपेल. या सूर्यग्रहणावेळी अद्भुत असे रिंग ऑफ फायर लोके पाहू शकतील. महाराष्ट्रासह काही भागात ते खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. तर देशातील काही भाग हा कंकणाकृती ग्रहण दिसणार आहे.

चंद्रग्रहणाप्रमाणेच सूर्यग्रहण देखील उघड्या डोळ्यांनी पाहू नये, असे आवाहन केले जात आहे. हे पाहण्यासाठी विविध उपकरणांचा वापर करावा, असे खगोलशास्त्र सांगण्यात येत आहे. आजचे सूर्यग्रहण हे खूप वेगळ्या पद्धतीचे आहे, असेही खगोलशास्त्र म्हटले आहे. या ग्रहणात सूर्याचा ९९ टक्के भाग झाकला जाईल. देशात काही ठिकाणी सूर्यग्रहणामुळे दिवसाच अंधार पडणार आहे. हे ग्रहण जवळपास सहा तासांच आहे.

कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय

खग्रास सूर्यग्रहणादरम्यान जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. सूर्याची प्रकाशित गोलाकार कडा दिसत असते. त्यालाच कंकणाकृती अवस्था म्हणतात. तशी कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. महाभारताचे युद्ध झालेल्या हरियाणामधील कुरुक्षेत्रावरुन या सूर्यग्रहणाची स्थिती कंकणाकृती दिसणार आहे.

कुठे दिसणार सूर्यग्रहण

ग्रहण भारत, नेपाळ, पाकिस्तान, यूएई, इथोपिया आणि कांगो मध्ये दिसेल. भारतात हरियाणा, उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. तर जयपुर, दिल्ली, चंडीगड, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, शिमला आणि लखनौ सारख्या शहरात काही प्रमाणात हे ग्रहण दिसणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या वाढदिवसापूर्वी कॉँग्रेसने वाटले ‘अच्छे दिन’चे लाडू

News Desk

पवारांच्या त्या ९ ट्विट्सना केंद्रीय कृषीमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

News Desk

शिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे !

swarit