HW Marathi
देश / विदेश

खुशखबर ! सोन्याच्या किंमतींमध्ये घट

मुंबई | देशात जवळपास ३२ हजारांवर गेलेले सोन्याच्या किंमतींमध्ये आता साधारणतः १००० रुपयांनी घट झाली आहे. आपल्याकडे सणावारांना लोकं मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात. त्यामुळेच सणावारांच्या काळात सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढतात. यंदा देखील दिवाळीच्या दरम्यान वाढलेल्या सोन्याच्या दरांमध्ये दिवाळी संपताच घसरण झाली आहे.

गेल्या महिन्याभराच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढले आहे. याचाच परिणाम देशातील सोन्याच्या किंमतींवर झाला. त्यामुळे सध्या अनेक सोनारांच्या दुकानांमध्ये सोने खरेदी करण्यासाठी गर्दी वाढली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला एक तोळा सोन्याची किंमत ३१ हजार ९०० रुपये इतकी होती. आज सोन्याची किंमत ३० हजार ८२७ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्याभरात साधारणतः सोन्याच्या किंमतींमध्ये प्रति तोळा १००० रुपयांची घट झाली आहे.

Related posts

बलात्कार पीडितेचा फोटो वापरण्यास सक्त मनाई | सर्वोच्च न्यायालय

News Desk

तिहेरी तलाकवर कायदा करणार मोदींचे स्वातंत्र्यदिनी आश्वासन

News Desk

करुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंरीत, २ जणांचा मृत्यू ४० जखमी

अपर्णा गोतपागर