HW News Marathi
देश / विदेश

16 व्या वर्षात 12 लाख पगार, शिक्षण फक्त 12 वी

चंदीगड हर्षितला गूगलने आयकॉन डिजाइनिंगसाठी सिलेक्ट केलं आहे. हर्षितने नुकतीच सरकारी मॉडल सीनियर सेकेंडरी स्कूलमधून 12 वीची परिक्षा दिली आहे. मिळालेल्या संधीमुळे त्याचा प्रवास अमेरिकेच्या दिशेने सुरू होणार आहे. त्यामुळे त्याचे पूढील शिक्षण कदाचीत अमेरिकेतच होण्याची शक्यता आहे. सध्या तो अमेरिकेला जाण्याची तयारी करत आहे ऑगस्ट महिण्याच्या शेवट पर्यंत तो अमेरिकेला रवाना होणार आहे. ज्या प्रोग्रामसाठी हार्षितची निवड झाली आहे तो गुगलचा स्पेशल प्रोग्राम असून, या प्रोग्रामसाठी त्याला एक वर्ष खास ट्रेनिंग दिले जाणार आहे. ट्रेनिंग दरम्यान, त्याला 4 लाख रूपये पगार असेल. ट्रेनिंग संपताच त्याला दरमहा 12 लाख रूपये पगार मिळणार आहे.

आपल्या नव्या कोऱ्या संधी आणि नोकरीबाबत सांगताना हर्षित म्हणतो, मला इंटरनेटवर विवीध प्रकारचे संशोधन करायला आवडते. एक दिवस जॉब सर्च करत असताना मला गूगल आयकॉन डिजाइनिंगबाबत समजले. मला ग्राफिक्स डिजायनिंगचे आवड होतीच. जी मी गेली 10 वर्षे मोठ्या आवडीने करत आलोय. म्हटलं चला अप्लाय करूया. अप्लिकेशन करताच माझी ऑनलाईन मुलाखतही झाली. त्यानंतर मी जे पोस्टर डिझाईन केलं त्यावरच मला ही संधी मिळाल्याचं हर्षित सांगतो.

दरम्यान, हर्षितचे आई-वडील हे पेशाने शिक्षक आहेत. तर, लहान भाऊ सध्या इयत्ता 10 वीत शिकत आहे. शिक्षणानिमित्त हर्षित सध्या त्याच्या काकांकडे राहतो. हर्ष‍ितला प्रधानमंत्री डिजिटल इंडिया स्कीमच्या अंतर्गत ७००० रुपयांचं बक्षिस देऊनही गौरविण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकातील राजीनामा दिलेले आमदार मुंबईच्या हॉटेलमध्ये

News Desk

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती | आयसीजे

News Desk

#NirbhayaCase : ४ आरोपींना १ फेब्रुवारीला सकाळी ६ वा, होणार फाशी

swarit