HW News Marathi
देश / विदेश

हे सरकार इंग्रजांप्रमाणे काम करत आहे | हार्दिक पटेल

अहमदाबाद | पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी हार्दिक पटेल यांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. हार्दिक पटेल हे स्वतःच्याच घरात अनिश्चित काळासाठी हे आंदोलन करणार असल्याचे समजते. तसेच त्यांच्या घराचा पाणीपुरवठा खंडित केला असल्याचा आणि मोठ्या संख्येने त्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच हे सरकार इंग्रजांप्रमाणे काम करत आहे, उपोषण रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी सरकारवर केला.

अहमदाबाद महामार्गावर त्यांच्या समर्थकांना रोखण्यात येत आहे. तसेच १६,००० लोकांना ताब्यात घेऊन प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्राची मागणी करण्यात येत आहे असा दावा हार्दिकने केला आहे. या आंदोलनासाठी आपण दोन महिने आधीच परवानगी मागितली असूनदेखील परवानगी मिळाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

२५ ऑगस्ट २०१५ रोजी गुजरातमध्ये पाटीदार आरक्षण आंदोलन करण्यात आले होते. त्यामध्ये सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले होते आणि १४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. हार्दिक पटेल यांच्या या उपोषणामुळे जुनागडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे. सार्वजनिक जागेवर जमावबंदी लागू केली गेली आहे. काँग्रेसचे ललित कथगरा, ललित वसोया, किरिट पटेल या तीन पाटीदार नेत्यांनीदेखील हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार येणार”, केजरीवालांची भविष्यवाणी

Darrell Miranda

बारावीच्या विद्यार्थ्यांचा दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार!

News Desk

पार्थ पवारांची ‘ती’ भूमिका व्यक्तिगत, आमचा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास !

News Desk