HW Marathi
Covid-19 देश / विदेश

#Lockdown5 : कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व बंद, तर केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने सूट देणार

मुंबई | संपूर्ण देशभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. केंद्र सरकारकडून आज (३० मे) केंद्राकडून पाचव्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आला आहे. लॉकडाऊन पाच हा फक्त कंटेनमेंट झोन पुरताच मर्यादित असणार असून कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध  टप्प्याटप्याने कमी होणार आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

पाचव्या लॉकडाऊनच्या कर्फ्यूच्या वेळेतही सरकारने शिथिलता देण्यात आली आहे. तसेच  पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर  केंद्राने राज्य सरकारकडे अधिक अधिकार दिले आहेत. आता राज्य किंवा जिल्ह्यांतील प्रवासासाठी परवानगीची गरज नाही. मात्र राज्यातील वाहतूक व्यवस्थांबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल. केंद्र सरकारने वाहतुकीबाबत निर्बंध हटवले आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल कटेंनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.

पहिला टप्पा

  • ८ जूननंतर धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार, सोशल डिस्टन्सिंग सक्तीचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येणार आहे.
  •  ३० जूनपर्यंत रात्री ९ वाजेपासून सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे
  • राज्यांतर्गत वा राज्या-राज्यात सर्व दळणवळणावर बंदी नाही
  • कसलीही परवानगी, मंजुरी व ई-परमिटची गरज नाही

दुसरा टप्पा

  • राज्य सरकार आपल्या स्तरावर निर्णय घेतील. त्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांच्या  पालकांशी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेतला जाईल. जुलै महिन्यात शाळा सुरु करण्याचा विचार आहे, त्यामुळे शाळा सुरु होणार की नाही हे जुलैमध्येच ठरेल.
  • सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनवर बंदी.

 

तिसरा टप्पा

  • तिसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमाने, मेट्रो रेल्वे, सिनेमा थिएटर, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, बार आणि ऑडिटोरियम याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.

 

संबंधित बातम्या

#Lockdown5 : देशात कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला

Related posts

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, पेट्रोल १२ पैशांनी महागले

अपर्णा गोतपागर

ग्रीन-ऑरेंज झोन जिल्ह्यात बाहेरून नागरिकांना पाठवू नये, कोरोनाची लोकांच्या मनात भीती !

News Desk

बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी, ६५ वर्षिय महिलेचा मृत्यू

News Desk