HW News Marathi
देश / विदेश

भारतात दोन ‘कोरोना’बाधित रुग्ण सापडले

नवी दिल्ली | जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस आता भारतात दाखल झाला आहे. कोरोना व्हायरसचे दोन रुग्ण भारतात अढळून आले आहे. हे दोन रुग्ण नवी दिल्ली आणि तेलंगणा राज्यात हे कोरोनाचे रुग्ण असल्याची माहिती भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

दिल्लीत ज्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, ती व्यक्ती इटलीहून आल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरी व्यक्ती ही दुबईहून आली आहे. यापूर्वी केरळमध्ये करोना व्हायरसचे तीन पीडित आढळल्याचे वृत्त यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते. सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. तसेच, डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू आहेत.

या पूर्वी चीनमधून आणण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना मानेसर येथील अलिप्त केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. या नागरिकांची तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण न झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या सर्वांना घरी पाठवण्यात आले. तर, दुसरीकडे परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर भारतातील महापुरामुळे जनजीवन विस्कळीत

News Desk

बिहार विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, कोणाशीही युती करणार नाही!

News Desk

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ भारतीय जवानांचा मृत्यु,ANI ची माहिती

News Desk