HW News Marathi
देश / विदेश

तामिळनाडूमध्ये पुन्हा राजकीय पेच

चेन्नई- तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या दोन गटांचे काल मनोमिलन होताच आज या पक्षात मोठी फूट पडल्याचे चित्र पाहवयास मिळाले. मंगळवारी सकाळी अण्णा द्रमुकचे उप महासचिव टीटीव्ही दिनकरन यांच्या समर्थकांनी बंडखोरी केल्याने तामिळनाडूच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. आज सकाळी या १९ बंडखोर आमदारांनी टीटीव्ही दिनकरन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर काही वेळातच ते राजभवनात पोहचले. यावेळी त्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले. यामुळे तामिळनाडूमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष पाहवयास मिळत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाणार प्रकल्प महाराष्ट्रातून जाऊ नये पण… शरद पवार

News Desk

मुंबईकराने वडापाव विकून केली शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत

News Desk

“बिचारे डॉ. हर्षवर्धन… ‘बळीचा बकरा’ ठरले”, काँग्रेस नेत्यांचा निशाणा

Jui Jadhav