HW Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील तब्बल ४०० हून अधिक नेत्यांना सुरक्षा पुरविण्याचे राज्यपालांचे आदेश

श्रीनगर | आगामी लोकसभा निवडणुकांकरिता जम्मू-काश्मीरमधील तब्बल ४०० हून अधिक नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी राज्यातील ९०० हून अधिक नेत्यांची सुरक्षा हटविण्यात आली होती. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर या नेत्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता असल्याने पुन्हा ४०० हून अधिक नेत्यांना पुन्हा सुरक्षा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. श्रीनगरमध्ये शनिवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील आवश्यक त्या नेत्यांना लवकरात लवकरच सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर येथील ९०० हून अधिक फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर येथील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या नेत्यांच्या सुरक्षेचा विचार करता निवडणुकांच्या काळात त्यांच्या जीवाला धोका असून त्याचा परिणाम निवडणुकांवर होईल, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये ११ एप्रिलपासून ६ मेपर्यंत एकूण ५ टप्प्यात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २३ मे रोजी याबाबतचा निकाल जाहीर होईल.

Related posts

शहीद जवानाच्या वडिलांचा सरकारला अल्टिमेटम

News Desk

भारत-पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द

अपर्णा गोतपागर

इस्रोच्या G SAT-29 या संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk