HW News Marathi
देश / विदेश

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरांनी घेतली राहूल गांधींची भेट

नवी दिल्ली | निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. आधी मुंबईत आणि नंतर दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी राजकीय वर्तृळात खुप चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा अशाच काहीशा चर्चा रंगत आहेत. त्याचं कारण असं आहे की, प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहूल गांधी यांची भेट घेतली आहे. नेमकी ही भेट का होती याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र, सध्या देशात, राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

तर काही दिवसांआधी दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर यांची भेट झाली होती. साधारण अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तीन दिवसांत या दोघांची दिल्लीत दुसऱ्यांदा भेट होत झाली होती. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली होती. दोघांमध्ये सुरु असलेल्या भेटीच्या सत्रामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात आजपर्यंत तीन भेटी झाल्या. या दोघांची पहिली भेट शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्वर ओकवर झाली होती. आता राहूल गांधींच्या भेटीनंतरही चर्चांची वावटळ उठण्यास सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजप हारला कोरोना जिंकला”, राऊतांचा भाजपला सणसणीत टोला

News Desk

आज नॅशनल फूड डे, भारताचा राष्ट्रीय अन्नपदार्थ कोणता ?

Gauri Tilekar

चांद्रयान – २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर मोदींकडून इस्रोचे कौतुक

News Desk