HW News Marathi
देश / विदेश

गुजरातमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हाणामारी

गुजरात | गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातील छसरा गावात काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतिच्या निवडणूका पार पडल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी दोन गटात मोठा वाद झाला. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी असल्याची धक्कादायक माहिती समोर अली आहे. सुरुवातीला वादात सुरुवात झाली नंतर तो वाद हिंसात्मकतेत रूपांतरित झाले आहे.

छसरा गावातील ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत महिला उमेदवार सरपंचपदी निवडणून आल्या. त्यामुळे, पराभूत झालेल्या गटाचा विजयी गटासोबत वाद उफाळून आला शाब्दिक वादाला वेळ न लागता मारामारीत रूपांतर झाले. दोन्ही गटांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी झाली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी आहेत. जखमी झालेल्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच छसरा गावात पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले असून. याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा पराभव

News Desk

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर बनवण्याच्या मोदींचा संकल्प

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातासंदर्भात घेतला मोठा निर्णय

Aprna
मुंबई

शिवस्मारकाला तांत्रिक परवानगी नाही, सरकारची जनतेच्या डोळयात धुळफेक | मलिक

swarit

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी कोणतीही तांत्रिक परवानगी नसताना कंत्राटदारांकडून फक्त काम सुरु केल्याचे दाखवून सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचे दोन वर्षापूर्वी मोदींनी जलपूजन केले होते. परंतु पुढे त्याचे काही झालेले नाही. परंतु आता निवडणूका डोळयासमोर आल्यावर कार्यकर्तृत्व दाखवण्यासाठी ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबतही तीच परिस्थिती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतही तीच परिस्थिती आहे. सरकार काही करत नाही नुसता प्रचारावर त्यांचा भर आहे अशी जोरदार टिकाही नवाब मलिक यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी जाहीर करण्यात आली. या कर्जमाफीचा किती फायदा झाला. ३८ हजार कोटीची कर्जमाफी १६ हजार कोटीचे वाटप अजुन झालेले नाही. दुष्काळ अजून जाहीर होत नाही. जलयुक्तशिवार योजनेचा प्रचार करत आहेत त्याचा फायदा मिळत नाही. एकंदरीत साडेचार वर्ष केंद्राचा आणि चार वर्ष राज्याचा कारभार पाहिला तर लोकांच्या जीवनात काही बदल झालेला नाही उलट बेरोजगारी,महागाई वाढत चालली आहे आणि आता लोकांच्या डोळयात धुळफेक करण्याचे काम सरकारने सुरु केल्याचेही नवाब मलिक म्हणाले आहेत.

Related posts

मुंबईला पावसाने झोडपले

News Desk

Parel Fire | चिमुरडीने वाचवले कुटुंबियांचे प्राण

News Desk

महापौरांसमोर पालिकेच्या मुख्य अभियंत्याला शिवसैनिकांनी केली मारहाण

News Desk