गुजरात | कोरोनाची तर चर्चा आहेच मात्र सध्या राजकीय वर्तृळातही अनेक चर्चा रंगत आहेत. गुजरातमधील भाजपचे ज्येष्ठ नेते, कायदा आणि शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंग चुडासामा यांना हायकोर्टाने एक मोठा धक्का दिला आहे. ढोलका विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अवैध असल्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Gujarat High Court has declared state minister and BJP MLA Bhupendrasinh Chudasama's 2017 election void for manipulation of vote counting process during elections.
(file pic) pic.twitter.com/fd5nOYBxVD— ANI (@ANI) May 12, 2020
भूपेंद्रसिंग चुडासामा २०१७ च्या निवडणुकीत ढोलका मतदारसंघातून अवघ्या ३२७ मतांच्या फरकाने निवडून आले होते. यावेळी त्यांना कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार अश्विन राठोड यांनी आवाहन दिले होते. चुडासामा यांच्यावर मतमोजणीत फेरफार केल्याचा आरोपही राठोड यांनी केला होता. या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ढोलकाचे अधिकारी धवल जानी यांची कोर्टाच्या आदेशाने बदली देखील करण्यात आली होती.
काँग्रेस नेते भरत सोलंकी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Welcome the decision of Gujarat High court on Dholka assembly election 2017. Satyamev Jayte. @INCIndia @SATAVRAJEEV
— Bharat Solanki (@BharatSolankee) May 12, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.