HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदींनी दिली एकतेची शपथ, देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन

गांधीनगर | सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४४वी जयंती आहे. वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील केवडियाला जाऊन जगातील सर्वात उंच असा पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला अभिवादन केले.स्टॅच्यू ऑफ यूनिटी येथे पंतप्रधान मोदी उपस्थितांना राष्ट्रीय एकता शपथ दिली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून ही सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या एकतेचे सूत्रधार आणि लोहपुरुषाला नमन असे ट्विट मोदींनी केले आहे.

तसेच पंतप्रधान एकता दिवस परेडमध्ये भागही घेणार आहे. तसेच टेक्नॉलॉजी डेमो साईटचा दौरा करतील आणि केवडियामध्ये सिव्हिल सर्व्हिस प्रोबेशनर्ससोबत संवाद साधणार आहेत. यानिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनेक योजनांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये पर्यटकांना रिव्हर राफ्टिंग, इको-टुरिझम, जंगल सफाई आदींसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. शाहांनी ‘रन फॉर युनिटी’ला फ्लॅग ऑफ केला. दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममधून रन फॉर युनिटीला सुरुवात झाली.

स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात १८२ मीटर उंच भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी लाखो लोक गर्दी करतात. हा पुतळा उभारून अवघे १ वर्षपूर्ण झाले, या वर्षभरात २६ लाखांहून अधिक पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. तसेच तब्बल ७१.६६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गुजरातच नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधूनही येथे पर्यटक येत असतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राहुल गांधी आक्रमक

News Desk

आमचे मित्र चुकले आणि दिल्लीला गेले – अशोक गेहलोत

News Desk

चीनने मदत म्हणून पाठवलेली कोरोना टेस्टिंग किट निकृष्ट

swarit