HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्रिपद हे काही एनजीओचे पद आहे का ?, संजय राऊत यांचा भाजपला सवाल

मुंबई | ” सत्तेच्या समसमान वाटपात मुख्यमंत्रिपद येत नाही काय?, मुख्यमंत्रिपद हे काही एनजीओचे पद आहे का, ” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे. राऊत पुढे असेही म्हटले की, समसमान वाटप म्हणजे सर्वच पदांचे ५०-५० वाटप करणे असते. मुंबईत शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज (३१ ऑक्टोबर) बैठक होणार असून, पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेता निवडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांची पत्रकार परिषदेत बोलत होते.

राऊत म्हणाले की, सत्तेचे समान वाटप होणार असे ठरले होते. मग त्यात मुख्यमंत्रिपद येत नाही का? मुख्यमंत्रिपद हे काही एनजीओचे पद आहे का, असा सवाल उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला. सत्तेत समान वाटा हवाच ही शविवसेनेची भूमिकेचा राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली असून भाजपने युती धर्माचे पालन करावे, असेही ते बोलताना म्हणाले.

विनाशकाले विपरित बुद्धी आमची नव्हे, तर भाजपची

शिवसेनेने कुठलेही पाऊल मागे घेतलेले नाही. मुख्यमंत्रिपद हे एनजीओचे पद आहे काय?, मुख्यमंत्रिपद हे सत्तेचे पद आहे. समसमान वाटप म्हणजे सर्वच पदांचे ५०-५० वाटप करणे असते. शिवसेना कोणत्याही पदांसाठी अडून बसलेली नाही. भाजपने सामंजस्याने घ्यायला हवे, विनाशकाले विपरित बुद्धी आमची नव्हे, तर त्यांची झाली आहे, अशी बोचरी टीका राऊतांनी राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केली आहे. भाजपकडे १४५चा आकडा असल्यास त्यांनी केव्हाही सरकार स्थापन करावे. भाजपच नव्हे, तर इतर कोणाकडेही १४५ आमदारांचे समर्थन असल्यास त्यांनी खुशाल सरकार तयार करावे, असे म्हणत त्यांना भाजपला टोलाही हाणला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने निवडणुकीपूर्वीच आत्मविश्वास गमावला, उमेदवारीच्या गोंधळावरून मुंडेंचा विरोधकांना टोला

News Desk

शिवसेनेचा मंत्री फडणवीसांना भेटायला तडफडत होता, निलेश राणेंच्या दाव्यावर उदय सामंत म्हणतात…

News Desk

बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारती बदलत आहे! – वर्षा गायकवाड

Aprna