HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेतील टेक्सास येथे मॉलमध्ये गोळीबार, २० जणांचा मृत्यू

अल पासो अमेरिकेतील टेक्सास येथे अज्ञात व्यक्तीने शॉपिंगमधील मॉलमध्य केलेल्या गोळीबारात २० जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अमेरिकी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता ही घटना घडली. वालमार्टच्या मॉलमध्ये हा संपूर्ण प्रकरण घटना घडली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टेक्सासचे लेफ्टनंट गव्हर्नर डॅन पॅट्रिक यांनी सांगितले की, या घटनेत २० लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर हा मॉल आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जात आहे. नागरिकांना या घटनास्थळाकडे येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

टेक्सासमधील या दुर्दैवी घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक डोनाल्ड ट्रम्प यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत २० नागरिकांचा मृत्यू ही अत्यंत दुःखदायक बाब आहे. ट्रम्प यांनी संपूर्ण घटनेचा निषेध केला असून निर्दोष लोकांचे जीव घेणाऱ्यांबद्दल कोणतीही सहानभुती दाखविणे चुकीचे ठरेल. या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…नाहीतर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा !

Gauri Tilekar

श्रीनगरमधील झिरो पुलावर दशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला

News Desk

अखेर सुप्रिया सुळेंकडे पार्थ पवारांनी व्यक्त केली दिलगिरी

News Desk