HW News Marathi
देश / विदेश

अखेर सुप्रिया सुळेंकडे पार्थ पवारांनी व्यक्त केली दिलगिरी

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले नातू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना जाहीररीत्या फटकारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार हे महाविकासआघाडी आणि राष्ट्रवादीशी विसंगत भूमिका घेताना दिसत होते. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर काल (१३ ऑगस्ट) रात्री पार्थ पवार यांनी सिल्व्हर ओक गाठले. त्यावेळी पार्थ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच त्यानंतर पार्थ यांनी शरद पवारांचीही भेट घेतली.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी काहीच दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. एकीकडे महाविकासाआघाडी सरकारचा हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यास विरोध असताना दुसरीकडे पार्थ यांनी ही विसंगत भूमिका घेतली. त्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पार्थ यांची ही मागणी सुद्धा फेटाळली. याच संदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारताच शरद पवारांनी पार्थ यांना कठोर शब्दांत फटकारले.

काय म्हणाले होते शरद पवार ?

शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारताना असे म्हटले कि, “पार्थ पवार इममॅच्युर. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही.” दरम्यान, पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांत राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि शरद पवारांविरोधात आणि विसंगत अशी भूमिका घेताना दिसून आले. राजकीय वर्तुळात याच पार्श्वभूमीवर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. त्यानंतर काल (१२ ऑगस्ट) खुद्द शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदीजीने लिया है अपने उपर सभी मजदूरोंका भार इसलिए…आठवलेंची मोदींवर कविता!

News Desk

“महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची दातखीळ बसली का?”, राऊतांचा सवाल

News Desk

गांधी हा एक परिवार नसून या देशाचं DNA आहे – यशोमती ठाकूर 

News Desk