HW Marathi
देश / विदेश

हमजा बिन लादेनचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश

नवी दिल्ली | अल् कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनला संयुक्त राष्ट्र संघाने काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे आता हमजा बिन लादेनच्या प्रवास आणि मालमत्तेवर निर्बंध आले आहेत. अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी हमजा बिन लादेन हा अमेरिकेवर हल्‍ला करण्याचा कट रचत होता. ही माहिती मिळतच अमेरिकेने कठोर पावले उचलली आहेत.

अमेरिकेने हमजा बिन लादेनची माहिती देणाऱ्या व्यक्तीला तब्बल १० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघाने देखील आता हमजा बिन लादेनच्या नावाचा समावेश केला आहे. सौदी अरेबियाने देखील हमजा बिन लादेनचे नागरिकत्व रद्द केले आहे.

Related posts

सलमानला जामीन मिळणार का?

News Desk

राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिमांचा हातभार

अपर्णा गोतपागर

तीन तलाक विधेयकाला केंद्र सरकारची मंजुरी

News Desk