HW Marathi
देश / विदेश राजकारण

राहुल गांधींच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांना 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाची विचारधारा, गांधी, नेहरु कुटुंबाचा राष्ट्रसेवेचा वारसा आपण समर्थपणे पुढे नेत आहात. देशातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या, देशवासियांच्या आशा-आकांक्षा आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आपणास बळ आणि उदंड दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा उपमख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात व्यक्त केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणतात की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत महत्वाचं योगदान असलेल्या काँग्रेस पक्षाचं नेतृत्वं करत असताना या देशातील लोकशाही, सर्वधर्मसमभावाची भावना अखंडीत ठेवण्यासाठी आपण दिलेलं योगदान महत्वाचं आहे. देशाची एकता, अखंडता कायम ठेवण्यात आपला पक्ष आणि कुटुंबानं केलेला त्याग, समर्पण कायम स्मरणात राहील. देशवासियांच्या मनात आपल्याबद्दल विशेष स्नेह, आपुलकी, आदर, विश्वास आहे. आपल्या व्यक्तिमत्वातल्या साधेपणात, सच्चेपणात एक मनस्वी ताकद दिसते. हीच ताकद यापुढच्या काळात राष्ट्रउभारणीत महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आहे. 50 व्या वाढदिवसाच्या आपणास मनापासून शुभेच्छा

Related posts

आमदारकीसाठी अनेक इच्छूक, आम्ही सर्वांचीच इच्छा पूर्ण करू शकत नाही !

News Desk

ज्याने तिरंग्याचा अपमान केला त्याला पकडावं, टिकैत यांचा पंतप्रधानांवर पलटवार

News Desk

एकदा घरोबा केला की, सारखे सारखे असे कुंकू बदलायच नसते !

News Desk