नवी दिल्ली | राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एनडीएच्या हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे. हरिवंश सिंह यांनी यूपीएचे बी. के. हरिप्रसाद यांचा पराभव केला. हरिवंश यांना १२५ मते तर हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाले. राज्यसभेच्या उपसभापतीसाठी आज एकूण २२२ खासदार मतदानावेळी सभागृहात उपस्थित होते.राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंनी हरिवंश सिंह यांनी विजयी झाल्याची घोषणा केली.
PM Narendra Modi congratulates NDA Candidate Harivansh Narayan Singh who was elected as Rajya Sabha Deputy Chairman pic.twitter.com/lTy2yRpxik
— ANI (@ANI) August 9, 2018
NDA Candidate Harivansh Narayan Singh elected as Rajya Sabha Deputy Chairman with 125 votes, UPA's BK Hariprasad got 105 votes. #RajyaSabhaDeputyChairman https://t.co/03Id4IyVDH
— ANI (@ANI) August 9, 2018
काँग्रेसचे पी. जे. कुरियन १ जुलै रोजी निवृत्त झाल्याने राज्यसभेतील उपसभापतीपद रिक्त झाले होते. राज्यसभेचे सध्या २४५ खासदार आहेत. उपसभापती पदाच्या निवडणुकीत विजयासाठी १२३ मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेत भाजपचे सर्वाधिक ७३ खासदार असून काँग्रेसचे ५० खासदार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.