HW News Marathi
देश / विदेश

राज्यसभेत उपसभापती पदासाठी मतदानाला सुरुवात

नवी दिल्ली | राज्यसभा उपसभापती पदासाठी गुरुवारी (आज) मतदानाला सुरुवात झाली आहे. एनडीएचे खासदार हरिवंश आणि यूपीएचे बी. के. हरिप्रसाद यांच्यात उपसभापती पदासाठी लढत होणार आहे. नक्की कोणत्या पक्षाचा उपसभापती होणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे पी. जे. कुरियन १ जुलै रोजी निवृत्त झाल्याने राज्यसभेतील उपसभापतीपद रिक्त झाले होते. राज्यसभेचे सध्या २४५ खासदार आहेत. उपसभापती पदाच्या निवडणुकीत विजयासाठी १२३ मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेत भाजपचे सर्वाधिक ७३ खासदार असून काँग्रेसचे ५० खासदार आहेत.

भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी आडिशोचे मुख्यमंत्री तथा बिजदचे अध्यक्ष नवीन पटनायक यांच्याकडे पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

Related posts

ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा

News Desk

दिल्लीतील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये भीषण आग

News Desk

एफएटीएफकडून पाकिस्तान ब्लॅकलिस्ट

News Desk