HW News Marathi
देश / विदेश

हाथरस प्रकरणी CBIने दाखल केला ‘हत्येचा गुन्हा’, तपास सुरु

उत्तर प्रदेश | हाथरसमधील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयनं प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी समितीही नियुक्त केली आहे. हाथरसमध्ये झालेल्या या घटनेननंतर देशात संतापाची लाट उसळी होती. या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी होत होती. तर योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशीही मागणी केली जात होती.

दरम्यान, हाथरस प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी याचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली जात होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मागणीची दखल घेत योगी सरकारनं हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती. केंद्रानं शनिवारी सीबीआयकडे तपास सोपवला. त्यानंतर सीबीआयनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चौकशी टीमही नियुक्त केली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकशाही धोक्यात असेल तर विशेष अधिवेशन बोलवा : यशवंत सिन्हा

News Desk

एलआयसीची आयडीबीआय बँकेला मदत,गुंतवणार १२ हजार कोटी

News Desk

“बिचारे डॉ. हर्षवर्धन… ‘बळीचा बकरा’ ठरले”, काँग्रेस नेत्यांचा निशाणा

Jui Jadhav