HW News Marathi
देश / विदेश

एलआयसीची आयडीबीआय बँकेला मदत,गुंतवणार १२ हजार कोटी

केंद्र सरकारची भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेला वाचविण्यासाठी धावून आली आहे. एकीकडे बँकेतील सरकारी हिस्सा खरेदी करतानाच एलआयसीने आता बँकेत आणखी १२ हजार कोटी रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारची नव्या पिढीतील बँक, असे बिरुद लावून आयडीबीआय बँक बाजारात आहे. पण तसे असतानाही बँक भीषण तोट्यात गेली. परिणामी त्याची विक्री करावी लागली. यामुळे एलआयसीला बँकेत भरमसाठ निधी ओतावा लागला. यानंतर आता पुन्हा हे महामंडळ १२ हजार कोटी रुपये गुंतवणार आहे. एलआयसीने मागील महिन्यात २१ हजार ६२४ कोटी रूपये गुंतवून आयडीबीआय बँकेचा ५१ टक्के हिस्सा ताब्यात घेतला होता.

बँकेतील बुडीत कर्जाचे प्रमाण डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत २९.६७ टक्क्यांवर पोहोचले. हे प्रमाण मागील आर्थिक वर्षात याच आठवड्यात २४.७२ टक्के होते. आता मार्च २०१९ ला संपणाऱ्या पुढील तिमाहीत हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठीच बँकेला १२ हजार कोटी रुपयांची गरज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधार-पॅन कार्ड लिंक करण्याचा आज शेवट दिवस

News Desk

चांद्रयान-२ : इतिहास रचण्यासाठी सज्ज

News Desk

“…फक्त मोदींची दाढीच वाढतेय”, ममता बॅनर्जींचा मोदींना खोचक टोला!

News Desk