HW News Marathi
देश / विदेश

रिपब्लिकन पक्षाच्या निधीतून हाथरस पीडितेच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत

हाथरस | उत्तर प्रदेशमध्ये हाथरस येथे १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या घटनेवरुन संपूर्ण देशातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, काल (६ ऑक्टोबर) केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेश येथील हाथरस मधील पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याआधी रामदास आठवले यांच्यावर शिवसेना, काँग्रेसकडून टीका करण्यात आली होती.‘आपण २ ऑक्टोबरलाच पीडित कुटुंबाच्या भेटीला जाणार होतो, मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून सर्व राजकीय नेत्यांना गावाबाहेरच अडवल्याचे समजले. त्यामुळे मी तिथे गेलो नसलो तरी लवकरच कुटुंबीयांची भेट घेणार असून दलितांवर होणाऱ्या अत्याचारांवर कठोर कारवाई करणार’ असल्याचं त्यांनी सांगितले होते.

मंत्री रामदास आठवले यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. ‘या प्रकरणी सीबीआय तपासाची शिफारस योगी सरकारतर्फे करण्यात आली आहे. तसेच एसआयटी देखील या प्रकरणी चौकशी करत आहे. पीडित कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. मीही याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहे. त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असं देखील ते म्हणाले.ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचं सांगत आठवलेंनी रोष व्यक्त केला. तर पक्षाच्या निधीतून पीडित कुटुंबाला पाच लाख रुपये देण्याची घोषणा देखील केली आहे. त्यामूळे रामदास आठवलेंनीही या प्रकरणात लक्ष घातल्यामूळे थआा काय वळण येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामूळे नाईलाजास्तव घरी बसलेल्या रेल्वेतील कंत्राटी कामगारांना पूर्ण पगार मिळणार

swarit

पाकिस्तानसारखा शेजारी कोणत्याही देशाला मिळू नये !

News Desk

शरद पवार मुख्यमंत्र्यांना शिकवणार पूरपरिस्थिती नियोजन, २० तारखेला होणार भेट..!

Gauri Tilekar