HW News Marathi
देश / विदेश

हाथरस प्रकरण : तृणमूल नेत्यांनाही उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की

उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेवरून राजकीय पक्ष आक्रमक झाले असून, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना पुढे जाऊ दिले नाही. त्यांच्यापाठोपाठ आज (२ ऑक्टोबर) तृणमूल नेत्यांच्या शिष्टमंडळालाही उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले आहे.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ आज तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळाला उत्तर प्रदेश पोलिसांनी भेट घेण्यापासून रोखलं. हाथरसच्या सीमेवरचं पोलिसांनी या शिष्टमंडळाला थांबवलं. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यावर तृणमूलचे खासदार ठाम राहिले. यावेळी पोलिसांकडून धक्काबुकी झाल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी धक्का दिल्यानं खासदार डेरेक ओब्रायन खाली कोसळले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरच्या अनंतनागमध्ये एका दशतवाद्याचा खात्मा

News Desk

शिस्तीबद्दल भाष्य केले कि हुकूमशहा समजले जाते | पंतप्रधान मोदी

Gauri Tilekar

आईचे दूध मिळत नसल्याने दरवर्षी अडीच लाख बालकांचा मृत्यू

News Desk