HW News Marathi
देश / विदेश

सिंगापूरमध्ये आज ‘किम-ट्रम्प’ भेट

सिंगापूर | उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहे. यासाठी उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सिंगापूरमध्ये दाखल झाले असून उत्तर कोरियाची अण्वस्त्रसिद्धता या भेटीच्या केंद्रभागी असणार आहे.

काही महिन्यांपासून अण्वस्त्रांची चाचणी उत्तर कोरियाने सुरु केली आहे. त्यामुळे किम जोंगला संयुक्त राष्ट्रसंघाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. त्याचबरोबर अमेरिकेने उत्तर कोरियाला कारवाईची धमकीही दिली होती. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या प्रमुखांनी भेटून सामंजस्याने चर्चा केली होती. दरम्यान आजच्या किम-ट्रम्प भेटीने कोरियाई युद्धाला औपचारिक पूर्णविराम मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे – प्रकाश जावडेकर

News Desk

पेट्रोल १९ पैसे तर डिझेल २० पैशांनी स्वस्त

News Desk

जैविक इंधनावर भारताचे पहिले विमान उड्डाण यशस्वी

Gauri Tilekar