HW News Marathi
देश / विदेश

अभिनेता आणि लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील आरोपी दीप सिंद्धू यांचे कार अपघातात मृत्यू

नवी दिल्ली | लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि अभिनेता दीप सिंद्धू यांचे कार अपघातात मृत्यू झाला आहे. दीप सिंद्धू यांचे काल (१६ फेब्रुवारी) रात्री दिल्लीहून भटिंडा जात अअसताना सोनीपत नजीक ट्रकने त्यांच्या स्कॉर्पिओ कारला धडक दिल्याने अपघाता झाला. हा अपघात इतका भीषण होता की दीप सिंद्धू यांचा जागीच मृत्यू झाला. दीप सिद्धू यांच्यासोबत प्रेयसी आणि अभिनेत्री रीना राय ही सुद्धा कारमध्ये होती. परंतु, या अपघातात रीना राय यांना किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रीना राय यांच्यावर उपचार सुरू आहे.

केंद्र सरकारच्या  कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांना पुकारलेल्या आंदोलनात त्यांनी पाठिंबा दिला होता. आणि गेल्या वर्षी कृषी कायद्यांविरोधात २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आणि दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये घडलेल्या प्रकरणात दीप सिद्धू आरोपी होते. या प्रकरणात दीप सिद्धू हे तुरुंगात राहिले होते. तर सध्या दीप सिंद्धू जामीनावर बाहेर होते. 

दीप सिद्धूची कार जवळपास २० ते ३० मीटरपर्यंत गेली होती. सिद्धूच्या अपघातात स्कॉर्पिओ कारचा पुढचा भाग चकाचूर झाली आहे. या अपघातात वेळी २२ टायर ट्रक रस्त्याच्या कडेला होता. दीप सिद्धूच्या स्कॉर्पिओ कारला २२ टायर ट्रॉलीला धडकली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पंजाबमध्ये विधानसभा निवडणूकची रणधुमाळी सुरू आहे. येत्या २० फेब्रुवारी  पंजाबमध्ये ११७ जागांवर मतदान होणार आहे. याच वेळी हा दीप सिद्धू अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याच्या चर्चा सध्या पंजाबच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ताडोबा अभयारण्यातील मीरा वाघिणीचा ‘या’ कारणामुळे मृत्यू

News Desk

दाऊदची संपत्ती जप्त करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

News Desk

भारताला धक्का, तिरंदाजीत दीपिका कुमारीचा क्वार्टर फायनलमध्ये सलग तीन सेटमध्ये पराभव 

News Desk