HW Marathi
देश / विदेश राजकारण

संसदेत रात्री उशिरा साथरोग सुधारणा विधेयक मंजूर

नवी दिल्ली । संसदेमध्ये सोमवारी (२१ सप्टेंबर) रात्री उशिरा साथरोग (सुधारणा) विधेयक, २०२० मंजूर झाले आहे. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या भाषणानंतर काही सदस्यांनी या विधेयकाचा विरोध केला. मात्र, रात्री १२ वाजून गेल्यानंतर अखेर विधेयकाला मंजुरी मिळाली. या विधेयकाच्या मंजुरीमुळे आता या साथीच्या काळात अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे नियम अधिक सक्षम आणि कठोर करण्यात आले आहेत. लोकसभेमध्ये या विधेयकावर चर्चा सुरु असताना केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, “गेल्या ३-४ वर्षांपासून सरकार साथीसारख्या विषयांसंदर्भात काम करण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजनांसंदर्भात काम करत आहे.”

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन या विधेयकाच्या चर्चेदरम्यान बोलताना पुढे म्हणाले की, सरकारकडून गेल्या बऱ्याच वर्षांपासून ‘राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य अधिनियम’ बनवण्याचे काम सुरु होते. पहिल्या २ वर्षांमध्ये आम्हाला केवळ ४ राज्यांनी सल्ला दिला. यामध्ये मध्य प्रदेश, त्रिपुरा, गोवा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश होता. मात्र, आता आमच्याकडे एकूण १४ राज्यांनी दिलेले सल्ले आहेत.” गेल्या ९ महिन्यांपासून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्राने राज्यांच्या मदतीने कोरोनाविरुद्ध मोहिम सुरु केल्याचेही केंद्रीय मंत्री यांनी हर्ष वर्धन यावेळी सांगितले आहे.

Related posts

कोळसा क्षेत्रातील सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणली जाईल | निर्मला सीतारामण

News Desk

‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’ , भाजपकडून मंदिरे सुरू करण्यासाठी आंदोलन

News Desk

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा चीनला स्पष्ट इशारा

News Desk