HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली | कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर आज (१६ जुलै) सर्वोच्च न्यायालय सुनावणी होणार आहे. जेडीएस आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी गेल्या आठवड्यात झाली. यावेळी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर मंगळवारपर्यंत (१६ जुलै) निर्णय घेऊ नका, असा आदेश न्यायालयाने गेल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.

एच. डी. कुमारस्वामी यांना १८ जुलैला बहुमत सिद्ध करण्यास विधानसभेच्या सभापतींनी सांगितले आहे. राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांची समजूत काढण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत. यापैकी दोन बंडखोर आमदारांचे मन वळविण्यात काँग्रेसला यश आले आहे. परंतु काही आमदार आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. तसेच, या बंडखोर आमदारांनी काँग्रेस नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे मुंबई पोलिसांना पत्र लिहून सांगितले आहे.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी, संघ का वाटतात दहशतवादी

News Desk

महानायक अमिताभ बच्चन यांनी दिनेश कार्तिकची माफी मागितली

News Desk

डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती, बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता !

News Desk