HW News Marathi
देश / विदेश

कंडोमध्ये लपवले हेरॉइन

चेन्नई: विमानतळावर सोनं, अंमली पदार्थ नेण्याच्या अफलातून कल्पना तस्कर लढवतात, पण त्या सुरक्षा रक्षकांच्या नजरेतून सुटत नाहीत. चेन्नई विमानतळावर एक जणाला बुधवारी शंभर ग्रॅम हेरॉइनसह अटक करण्यात आली. हे हेरॉइन त्याने चक्क कंडोममध्ये लपवले होते. सीआयएसएफच्या सुरक्षा रक्षकांनी या माणसाला तपासणीसाठी थांबवले. तो कोलंबोला जात होता. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या माणसाचा मूत्राशयाकडचा भाग मोठा दिसत असल्याच’ सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. तपासणी केली तेव्हा लक्षात आले की या माणसानं कंडोम घातला होता आणि त्यात हेरॉइन रबर बँडच्या आधारे बांधून ठेवले होते.’ हा आरोपी चेन्नईमधील एका कॉलेजमध्ये स्टोअरकीपरची नोकरी करतो. हे प्रकरण कस्टमकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात बोईंग ७३७ मॅक्स-८ विमान वापरावर बंदी

News Desk

पंतप्रधान मोदी, आम्ही इथले भाडेकरू नाही | असदुद्दीन ओवैसी

News Desk

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

Aprna