HW News Marathi
देश / विदेश

लालू प्रसाद यादव यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

रांची | चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना राची हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळून मोठा धक्का दिला आहे. जामिनावर बाहेर असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी जामीन वाढविण्याची याचिका हायकोर्टात दाखल केली होती. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांना पुन्हा एकदा ३० ऑगस्टपर्यंत तुरुंगात जावे लागणार आहे.

लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडल्यामुळे सुरुवातीला दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर त्यांना मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्युटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दरम्यान यादव यांचे वकील प्रभात कुमार यांनी पुढील उपचार रांची मधील राजेंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये करण्यात येणार आहेत.

Related posts

महापुरुषांचे कौतुक केल्यावरही आमच्यावर टीका होते | मोदी

Gauri Tilekar

भाजपने पंकजा मुंडेंवर सोपवली मोठी जबाबदारी!

News Desk

अरुण जेटली, सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्म विभूषण जाहीर

swarit