HW News Marathi
देश / विदेश

पुण्याच्या हाय एक्सप्लोझीव्ह कारखान्यात वायू गळती

पुणे | पुणे येथील एचई (हाय एक्सप्लोझीव्ह) कारखान्यात सकाळी दहा वाजताच्या सुमारास एका वाहिनीतून अचानक वायू गळती सुरु झाली. या वाहिनीतून सोडियम नायट्रेट या विषारी वायूची गळती होत असल्यामुळे शेजारीच असलेल्या अम्यूनेशन फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांना उलट्या होणे, चक्कर येणे, मळमळ होणे असा त्रास सुरू झाला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तत्काळ ए. एफ. के. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फॅक्टरीतील सुमारे ३,००० कर्मचाऱ्यांना कारखान्याच्या बाहेर पाठवण्यात आले, याबाबतची माहिती खडकी परिसरात पसरताच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना उलट्या होणे, चक्कर येणे, मळमळ होणे असा त्रास होत होता. त्यांना आम्ही ऑक्सिजन पुरवठा करून सलाईन लावले. तसेच इन्हेलर दिले आहे.

काही रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी सोडून दिले. आता ४२ महिला आणि पुरुष रुग्ण उपचार घेत असल्याची माहीती एएफके रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पी. आर. मलिक यांनी दिली. दरम्यान प्रशासनाच्या वतीने फॅक्टरीमधील पाइपलाइनचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धोका टळला | चीनचे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात कोसळले

News Desk

मुख्यमंत्री पदाचे दावेदार सिद्धरामय्या चामुंडेश्वरी मतदार संघातून पराभूत

Adil

शशिकलाचीही सुटका होणार

News Desk