मुंबई | भारतात गेल्या २४ तासात ५ हजार ६११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात एका दिवसात आजवर झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. तर १४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर पोहोचली आहे. तसेच देशात सध्या कोरोनाचे ६१ हजार १४९ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशात ४२ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आणि ३ हजार ३०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Highest ever spike of 5,611 #COVID19 cases & 140 deaths in the last 24 hours. Total number of cases in the country now at 106750, including 61149 active cases & 3303 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/kj95C6b8Is
— ANI (@ANI) May 20, 2020
देशात गेल्या २४ तासात एकूण एक लाख आठ हजार १२१ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आजवरचा देशात २५ लाख १२ हजार ३८८ लोकांची कोरोनासाठीची चाचणी घेण्यात आली आहे. तसेच देशातील महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार १३६ वर पोहोचली आहे. राज्यात काल (१९ मे) २१२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल १२०२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९६३९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.