हिमाचरल | सध्या भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशला पावसाने झोडपलेय. पावसात बस स्थानकातील बस पाण्यात वाहून गेली, सुदैवाने ही बस रिकामी होती. त्यामुळे कोणतीही जिवीत हाणी झाली नाही. तर व्यास नदी दुथडी भरून वाहत असल्याने कुलू आणि मनाली दरम्यानचा संपर्क तुटलाय. तसेच मुसळधार पावसामुळे हिमाचलामध्ये आयआयटीचे ३५ विद्यार्थीसह ४५ नागरिक बेपत्ता झाले आहे. हिमाचलमध्ये पूज्य परिस्थिती निर्माण झाली असून एक ट्रकही वाहून गेली आहे. या पुरामुळे पर्यटनावरही विपरीत परिणाम झाला आहे. या कारणामुळे पर्यटकांनी हिमाचलची ट्रिप रद्द केली आहे.
Himachal Pradesh: 45 ppl including 35 IIT Roorkee students are missing in Lahul Spiti. Rajvir Singh, father of one of the students Ankit Bhati, said that they had gone for trekking to Hamta trekking pass in Kullu & were supposed to return to Manali, but now they've lost contact
— ANI (@ANI) September 24, 2018
Himachal Pradesh: Situation in Mandi district improves after heavy rainfall lashed the state yesterday pic.twitter.com/2CoECMhj7S
— ANI (@ANI) September 25, 2018
हिमाचलमधील पुराच्या या तांडवामुळे १२ जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिमला, कुल्लू, सोलन, चंबा, कांगरा आणि सिरमौरमध्ये आज शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आलेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पंजाबमध्येही आज शाळा बंद आहेत.हिमाचल प्रदेशमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चंबा भागातल्या धरणांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. चामेरा धरणातून हजारो लीटर पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने व्यास नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. काश्मीर आणि हिमाचलच नाही. तर उत्तराखंडलाही मुसळधार पावसाने झोडपले.
डोंगराळ भाग असल्यामुळे इथून लोकांना इतरत्र हलवणे आणि बचावकार्य करणे, यात नेहमीच अधिक अडचणी येतात. या सगळ्यामुळे हिमाचलचं वातावरण अचानक बदलले. इथे ऐन सप्टेंबर महिन्यात जोरदार बर्फवृष्टी झालीय. बर्फवृष्टीमुळे मनालीहून लेहला जाणारा मार्ग बंद झालाय. व्यास नदी दुथडी भरून वाहत असल्यानं कुलू आणि मनाली दरम्यानचा संपर्क तुटलाय. या पुरामुळं एक ट्रकही वाहून गेला. या पुरामुळे पर्यटनावरही विपरीत परिणाम झाला आहे. कारण अशा दृश्यांमध्ये शेकडो पर्यटकांनी हिमाचलची ट्रिप रद्द केली आहे. बर्फवृष्टीमुळे इथे पर्यटकांना येण्यासही मनाई करण्यात आली.
Himachal Pradesh: Apple crop damaged due to fresh snowfall in Udaypur region of Lahaul-Spiti district pic.twitter.com/wicbhJ4ovI
— ANI (@ANI) September 25, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.