नवी दिल्ली | हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातली भाजपचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशायस्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयाशेजारीच शर्मा यांचा फ्लॅट असून या फ्लॅटमध्ये आज सकाळी त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नसून त्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८.३० वाजता त्यांना गोमती अपार्टमेंटमध्ये खासदार रामस्वरुप शर्मा यांनी आत्महत्या केल्याची खबर मिळाली. पोलीस अधिकारी जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करत आहे. दरम्यान, शर्मा यांच्या मृत्यूमुळे भाजपच्या संसदीय दलाची आज होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे.
BJP MP from Mandi, Ram Swaroop Sharma died allegedly by suicide in Delhi. Police received a call from a staffer. He was found hanging and the door was closed from inside: Delhi Police
Visuals from Gomti Apartments where he was found dead. pic.twitter.com/OVOs1NP5W2
— ANI (@ANI) March 17, 2021
हिमाचल प्रदेश भाजप सचिव म्हणून कार्यरत होते. तसंच त्यांनी ‘हिमाचल फूड अॅन्ड सिव्हिल सप्लाय कॉर्पोरेशन’चं अध्यक्षपदही हाताळलं होतं. २०१४ साली भाजपकडून रामस्वरुप शर्मा यांना मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांना जवळपास ४० हजार मतांच्या फरकानं पछाडलं होतं. या निवडणुकीत हिमाचलच्या चारही जागांवर भाजपला विजय मिळाला होता. २०१९ सालीही रामस्वरुप शर्मा यांनी मंडी लोकसभा मतदारसंघाचीच निवड केली होती. यावेळीही ते भरघोस मतांनी निवडून आले होते.
Delhi: The body of BJP MP Ram Swaroop Sharma being brought out of his residence. MoS Finance and Corporate Affairs Anurag Thakur reaches the spot. pic.twitter.com/Dsek4KrbVi
— ANI (@ANI) March 17, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.