HW News Marathi
देश / विदेश

हनीप्रीत बाबा-रहीमसोबत जेलमध्ये भेटणार ?

पंचकुला: बलात्कार प्रकरणात बाबा राम रहिम यास अटक झाल्यानंतर हरियाणामध्ये हिंसाचा उसळून अनेकजण ठार झाले. याचवेळी बाबासोबत सावलीप्रमाणे वावरणारी त्यांनी मानलेली मुलगी हनीप्रीत मात्र अनपेक्षीतरित्या गायब झाली होती. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नेपाळपासून सर्व परिसर पिंजुन काढला परंतु तिचा काही थांगपत्ता लागला नाही. अखेर मंगळवारी तिला अटक करण्यात आले. ती ३८ दिवस कुठे गायब होती, याचे गुढ आता उकलले आहे.

हनीप्रीतने पोलिसांनी चकवा देण्यासाठी नेपाळ परिसरात आपली चारचाकी गाडी सोडून दिली होती. जेणेकरून पोलीस त्या दिशेने तपास करतली, असा तिचा मनसुबा होता. झालेही तसेच पोलिसांनी तिच्या शोधार्थ संपूर्ण नेपाळ परिसर पिंजुन काढला परंतु ती काही हाती लागली नाही. दोन दिवसांपूर्वी ती पोलिसांना शरण आली. तिने सांगितले की ती पंजबामध्येच होती. डेरामधील एका अनुयायाच्या घरी ती थांबली होती. परंतु ती इथे थांबल्याची माहिती फुटल्यामुळे ती शरण आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, बाबा राम-रहीम यास अटक होताच हनीप्रीतीने बाबासोबत जेलमध्ये राहण्याची विनंती केली होती. ती अटक झाल्याने मान्य होते का, हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. असे झाल्यास राम-रहीम व हनीची प्रीत पुन्हा फुलण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोलकातामधील माजेरहाट पूल कोसळला

News Desk

अण्णा हजारे यांचे उपोषण मागे

News Desk

वडीलांच्या अंत्यसंस्कारात मुली नाचतात तेंव्हा..

News Desk