HW Marathi
देश / विदेश राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

निर्भयाचे गुन्हेगार फासावर लटकल्याने कायद्याचा सन्मान राखला गेला !

मुंबई | संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना आज (२० मार्च) पहाटे ठीक ५.३० वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकविण्यात आले. तब्बल गेला ७ वर्षांहूनही अधिक काळ सुरु असलेल्या या न्यायासाठीच्या संघर्षाला आज अखेर यश आले आहे. याच पार्श्वभूमीवर, सर्वच स्तरांतून एक प्रकारचे समाधान व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “निर्भयाचे गुन्हेगार अखेर फासावर लटकले. कायद्याचा सन्मान राखला गेला”, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “कायद्याचे राज्य आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही हा संदेश देणारी ही घटना आहे. या आरोपींची फाशी म्हणजे असे गुन्हे करणाऱ्या मानसिकतेला सणसणीत चपराक आहे”, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंसह महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “निर्भयाला अखेर न्याय मिळाला याचे समाधान वाटते. गेली ७ वर्षे निर्भयाच्या आईने जो संघर्ष केला त्यासाठी त्यांना मनापासून सॅल्यूट. कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आज आरोपींना ही शिक्षा झाली. न्यायव्यस्थेला देखील मनापासून धन्यवाद देते. समाजाने एकत्र येऊन अशा विकृतीचा नायनाट करणे, यासाठी समाजाचे प्रबोधन होणे फार गरजेचे आहे. कारण, फार उशिरा मिळालेला हा न्याय हा देखील कधी कधी अन्याय वाटू शकतो. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे कि, त्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्रातही दिशा कायदा लागू करावा”, अशी मागणी यावेळी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

Related posts

Prithviraj Chavan Exclusive : फडणवीस सरकारच्या काळात एकही मोठा पायाभूत प्रकल्प पूर्ण झाला नाही !

News Desk

मोठ्या शहरातील महामार्गावर चालवता येणार वाइनशॉप, बिअरबार

News Desk

शरद पवारांचे ‘ते’ ट्विट, संजय राऊतांकडून ‘रिट्विट’

News Desk