HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्राचा भव्य आरोग्यसह्याद्री-आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे

डाॅ. कपिल झोटिंग | होय आज कोरोना च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे साहेब जी कामगिरी करत आहेत त्याचे शब्दांत वर्णन करणे अपुरे पडते.आज राजेशभैय्या ज्या पद्धतीने ही सगळी परिस्थिती हाताळत आहेत ते बघून ह्या लढवय्या माणसाला सलामचं करावा वाटतो.

शारदाताई आणि अंकुशराव टोपे साहेबांच्या पोटी ११ जानेवारी १९६९ रोजी राजेशभैय्यांचा जन्म झाला.शिक्षण,सहकार,

राजकारणाचा वारसा घरातच होता परंतु तरीही उच्चशिक्षणाची ओढ आणि विशेष आवड होती.त्यामुळेच भैय्यासाहेबांनी BE (Civil) चे शिक्षण चांगल्या श्रेणीत पूर्ण केले.घरातच राजकीय वारसा असल्याने राजकारणासोबत समाजकारणाची ही ओढ होतीच ह्या अनुषंगाने १९९१-९२ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी त्यांची निवड झाली आणि अशा पद्धतीने भैय्यासाहेबांचा राजकारणात श्रीगणेशा झाला.त्यांचे कार्य बघून १९९२-१९९६ ह्या दरम्यानराष्ट्रीय काँग्रेस चे जालना जिल्हाध्यक्षपद राजेश भैय्यांना देण्यात आले.१९९७ साली अंबड तालुक्यातील जनतेने भैय्यासाहेबांना झिरपी गटातून जिल्हा परिषद सदस्य केले.अशा रीतीने भैय्यासाहेबांची सक्रिय राजकारणात सुरुवात झाली.जि प सदस्य असताना च विधानसभा निवडणूक लागली आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत भैय्यासाहेब अंबड विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिकक्याने विजयी झाले.भैय्यासाहेबांच्या कार्याची चुणूक बघून २००१ च्या मंत्रिमंडळात भैय्यासाहेबांना राज्यमंत्री म्हणून संधी दिली .जलसंधारण,पर्यावरण, उद्योग – वाणिज्य राज्यमंत्री म्हणून त्यांना पदभार दिला.

२००४ च्या विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा ४० हजारांच्या प्रचंड मतांनी भैय्यासाहेब पुन्हा विजयी झाले.२००४ साली भैय्यासाहेबांना नगरविकास,जलसंधारण,संसदीय कार्य,सामान्य प्रशासन राज्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा संधी देण्यात आली तसेच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ही नियुक्ती करण्यात आली.कार्यक्षम मंत्री म्हणून तसेच त्यांनी सभागृहात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा सभागृहाने वेळोवेळी गौरव केला.विरोधी पक्षातील नेत्यांनी ही एक परफॉर्मिंग मिनिस्टर म्हणून त्यांचा गौरव केला.त्यांच्या उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून २००८ च्या मंत्रिमंडळ विस्तारात भैय्यासाहेबांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात आली.वैद्यकीय व उच्च शिक्षणमंत्री या खात्याची जबाबदारी भैय्यासाहेबांना देण्यात आली.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत घनसावंगी मतदारसंघातून भैय्यासाहेबांनी हॅट्ट्रिक साधली.मागील वर्षभरातील कार्यपद्धतीचा अभ्यास तसेच कार्य बघता भैय्यासाहेबांना पुन्हा एकदा उच्च व तंत्रशिक्षण कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली.जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पद ही सोपवण्यात आले.उच्च व तंत्रशिक्षण खात्यातील त्यांच्या कामगिरीचा उल्लेख आजही निघाला तरी सर्वजण मोठ्या अभिमानाने भैय्यासाहेबांचे नाव घेतात कारण उच्च व तंत्रशिक्षण खात्यातील त्यांची कामगिरी जबरदस्त आणि विशेष राहिलेली आहे.२०१४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा भैय्यासाहेब विजयी झाले.विरोधी पक्षात असूनही सत्ताधारी पक्षाचे मंत्री उच्च व तंत्रशिक्षण खात्यासंबंधी काही निर्णय घ्यायचा असेल तर भैय्यासाहेबांची आवर्जून मदत घेत असत असे तत्कालीन मंत्र्यांनी वेळोवेळी सांगितले आहे.

२०१९ साली सलग पाचव्यांदा आमदारकीची माळ राजेशभैय्यांच्या गळ्यात पडली.ठाकरे सरकारमध्ये भैय्यासाहेबांना सार्वजनिक आरोग्यमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले.पेशाने डॉक्टर नसलेले भैय्यासाहेब आरोग्यमंत्री पद सांभाळतील की नाही असे लोकांना वाटायचे परंतु आजघडीला कोरोना च्या उपाययोजना संबंधी लहानांपासून थोरांच्या ओठी केवळ आणि केवळ भैय्यासाहेबांचे च नाव आहे.भैय्यासाहेब अनुभव कौशल्याच्या जोरावर अगदी उत्कृष्टपणे आणि नियोजनबद्ध आरोग्ययंत्रणा हाताळत आहेत हे बघून प्रत्येकाला आपल्या आरोग्यमंत्र्याचा अभिमान वाटतोय.आज जगात कोरोना रोगाने थैमान घातले आहे परंतु आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे साहेब ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत त्यावरून आपल्या महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याचे नाव देशभरात उत्कृष्ट पद्धतीने गाजत आहे.

भैय्यासाहेबांची आई गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात चिंताजनक अवस्थेत आहेत परंतु त्यांचा लेक आईला दिवसभरातील फक्त १५-२० मिनिटं देऊन बाकी वेळ महाराष्ट्रातील जनतेसाठी देऊन महाराष्ट्रातील जनतेचे मातृत्व स्वीकारलं आहे हे दाखवून देतोय.भैय्यासाहेब आज १८-१८ तास काम करून कोरोना च्या प्रत्येक पेशंट ची अपडेट घेत आहेत तसेच मीडिया ला ही माहिती देताना संयमाने पूर्ण सहकार्य करत आहे.स्वतः कोरोना च्या रुग्णांची जाऊन भेट घेणारा तसेच हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी करणारा अवलिया आज आपल्याला संकटकाळी आरोग्यमंत्री म्हणून लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य च म्हणावं लागेल.आदरणीय पवार साहेब आणि स्व.अंकुशराव टोपे साहेबांच्या तालमीत तयार झालेले राजेशभैय्या टोपे साहेब आज खऱ्या अर्थाने कर्तृत्वाने आणि ज्या तत्परतेने महाराष्ट्र गाजवत आहेत त्यावरून असे वाटते ही भैय्यासाहेबांचे हे ऋण महाराष्ट्र कदापी विसरणार नाही.

भैय्यासाहेब तुमच्या कार्याला माझा आणि महाराष्ट्राचा सलाम 🙏🙏

लेखक :

डॉ.कपिल झोटिंग

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,

औरंगाबाद

९७६७८५४३१५

Kapilraje777@gmail.com

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॅटने पालिका अधिकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आकाश विजयवर्गीयला अटक

News Desk

अजित पवार अर्थमंत्री होणार ?

News Desk

आता फक्त १५३ रुपयात पाहा टीव्ही चॅनेल्स

News Desk