नवी दिल्ली | पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत तिहेरी तलाकवरून नवा वादंग ‘केवळ मुसलमानच नव्हे तर, हिंदू, ख्रिश्चन, शीख धर्मातही स्त्रियांना असमान वागणूक दिली गेली आहे. आपल्या समाजात कायमच पुरुषांचे वर्चस्व अधिक राहिले आहे. श्री रामचंद्रांनीसुद्धा सीतेवर संशय घेऊन तिला सोडले होते. त्यामुळे आपल्या सर्वांनाच बदल घडवून आणायचा आहे’, असे वादग्रस्त विधान करून काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी स्वतःवर मोठा रोष ओढवून घेतला आहे.
Women treated unfairly in all communities, not just Muslims, even Hindus, Christians, Sikhs etc. In every society, there is male domination. Even Shree Ram Chandra ji once left Sita ji after doubting her. So we need to change as a whole: Hussain Dalwai, Congress #TripleTalaqBill pic.twitter.com/dpuh0c3Jyu
— ANI (@ANI) August 10, 2018
तिहेरी तलाकची पद्धत अवैध ठरवणारे विधेयक डिसेंबर महिन्यात लोकसभेत मंजूर झाले आहे. त्यामुळे सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेतही हे विधेयक मंजूर करून घेण्याच्या प्रयत्नात केले होते. तीन तलाक विधेयक मंजूर करण्यासाठी स्पष्ट असे बहुमत मिळाले नाही. त्यामुळे हे विधेयक हिवाळी आधिवेशनात मांडले जाणार आहे.
‘कोणाच्या ही भावना दुखविण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. आणि मी केलेल्या विधानावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी का मागावी,’ असे हुसेन दलवाई यांनी तीन तलाक संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधाना बदल माफी मागितली.
What I said is wrong,have apologised. Didn't want to hurt sentiments. It's being intentionally politicised. Why should R Gandhi apologise when I said that?: H Dalwai,Congress on his remark'Women treated unfairly in all communities.Even Ram ji once left Sita ji after doubting her' pic.twitter.com/kX93ztfNMK
— ANI (@ANI) August 10, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.